wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यशया धडा 57
  • 1 सर्व सज्जन माणसे नष्ट झाली. ह्याची कोणी साधी दखलही घेतली नाही. सज्जन लोक एकत्र जमले पण का ते त्यांना कळत नाही, तेव्हा संकटापासून वाचविण्यासाठी सज्जनांना दूर नेले गेले हे कोणालाही समजले नाही.
  • 2 पण शांती येईल, लोक स्वत:च्या खाटल्यावर विश्रांती घेतील. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ते जीवन जगतील.
  • 3 “चेटकिणीच्या मुलांनो, इकडे या. तुमच्या वडिलांनी व्यभिचार केला. त्यामुळे ते अपराधी आहेत. तुमची आई देहविक्रय करते. तुम्ही इकडे या.
  • 4 तुम्ही दुष्ट आणि खोटारडी मुले आहात. तुम्ही माझी चेष्टा करता. तुम्ही मला वेडावून दाखविता. तुम्ही मला जीभ काढून दाखविता.
  • 5 तुम्हाला प्रत्येकाला हिरव्या झाडाखाली फक्त खोट्या देवांची पूजा करायची आहे. प्रत्येक झऱ्याकाठी तुम्ही मुले ठार मारता आणि खडकाळ प्रदेशात त्यांचे बळी देता.
  • 6 नदीतल्या गुळगुळीत गोट्यांची पूजा करायला तुम्हाला आवडते. त्यांची पूजा करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर मद्य ओतता, त्यांना बळी अर्पण करता. पण तुम्हाला त्या दगडांशिवाय काही मिळत नाही. ह्यामुळे मला आनंद होतो असे तुम्हाला वाटते का? नाही. मला ह्यामुळे अजिबात आनंद होत नाही. प्रत्येक टेकडीवर व उंच डोंगरावर तुम्ही तुमचे अंथरूण तयार करता.
  • 7 तुम्ही ह्या ठिकाणी जमता आणि बळी अर्पण करता.
  • 8 मग तुम्ही त्या अंथरूणात शिरता आणि त्या खोट्या देवांवर प्रेम करता. अशाप्रकारे वागणे हे माझ्याविरूध्द आहे. असे वागून तुम्ही पापे करता. तुम्ही त्या देवांवर प्रेम करता. त्यांची नग्न शरीरे पाहायला तुम्हाला आवडते. प्रथम तुम्ही माझ्याबरोबर होता. पण त्यांच्यासाठी तुम्ही मला सोडले. माझी आठवण तुम्हाला करून देणाऱ्या वस्तू तुम्ही लपवून ठेवता. तुम्ही अशा वस्तू दारामागे वा दाराच्या खांबामागे लपवून ठेवता व मग त्या खोट्या देवांकडे जाऊन त्यांच्याबरोबर करार करता.
  • 9 तुम्ही मोलेखला चांगले दिसावे म्हणून तेले आणि अत्तरे वापरता. तुम्ही तुमचे दूत अती दूरच्या देशांत पाठविले. हे तुमचे कृत्यु तुम्हाला अधोलोकात पोहोचवील.
  • 10 “ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली. पण तुम्ही कधीच दमला नाहीत. तुम्हाला या गोष्टींमुळे आनंद मिळत असल्याने तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त झाली.
  • 11 तुम्हाला माझी उठवण झाली नाही. तुम्ही माझी दखलही घेतली नाही. मग तुम्ही कोणाची काळजी करीत होता? तुम्ही कोणाला भीत होता? तुम्ही खोटे का बोललात? पाहा! मी बराच वेळ गप्प बसलो आणि तुम्ही माझा मान ठेवला नाहीत.
  • 12 मी तुमच्या ‘चांगुलपणाबद्दल’ आणि सर्व ‘धार्मिक’ कृत्यांबद्दल सांगू शकलो असतो पण त्या गोष्टीत काही अर्थ नाही.
  • 13 जेव्हा तुम्हाला मदतीची जरूर असते, तेव्हा तुम्ही तुमच्याभोवती जमविलेल्या खोट्या देवांची करूणा भाकता. पण मी तुम्हाला सांगतो की वाऱ्याची फुंकर सुध्दा त्या देवाना दूर उडवून देईल. झंझावात त्यांना तुमच्यापासून दूर नेईल. पण माझ्यावर विसंबणाऱ्याला जमीन मिळेल. माझा पवित्र डोंगर त्याचा होईल.
  • 14 रस्ता मोकळा करा. रस्ता मोकळा करा. माझ्या लोकांकरिता रस्ता मोकळा करा.
  • 15 देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
  • 16 मी अखंड लढाई करीत राहणार नाही. मी नेहमी रागावणार नाही. मी सतत रागावलो तर माणसाचा आत्मा मीत्याला दिलेले जीवन - माझ्यासमोर मरून जाईल.
  • 17 ह्या लोकांनी पापे केली म्हणून मला राग आला. मग मी इस्राएलला शिक्षा केली. मी रागावलो असल्याने त्यांच्यापासून तोंड फिरविले. इस्राएलने मला सोडले त्याला पाहिजे त्या ठिकाणी तो गेला.
  • 18 इस्राएल कोठे गेला ते मी पाहिले म्हणून मी त्याला बरे करीन. (क्षमा करीन.) मी त्याचे दु:ख हलके करीन आणि त्याला बरे वाटावे म्हणून शब्दांची फुंकर घालीन. मग त्याला व त्याच्या लोकांना वाईट वाटणार नाही.
  • 19 मी त्यांना ‘शांती’ हा नवा शब्द शिकवीन. माझ्या जवळ वा दूर असणाऱ्यांना मी शांती देईन. मी त्या लोकांना बरे करीन. त्यांना क्षमा करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या
  • 20 पण पापी हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे असतात. ते गप्प बसत नाहीत, शांत राहत नाही. ते रागावतात आणि खवळलेल्या समुद्रप्रमाणेच चिखल ढवळून काढतात. माझा देव म्हणतो,
  • 21 ”पाप्यांना कधी शांती मिळत नाही.”